उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खाते नाही, पण तीन खात्यांची जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. असे असले तरी सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही.

28 जानेवारी रोजी सकाळी एका विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटपदी एकमुखाने निवड केली. त्यानंतर आज लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन आणि अल्पसंख्यांक विकास या तीन मंत्रालयाचा कारभार असणार आहे. असे असले तरी अर्थखातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असणार आहे.