पार्थ पवारांविरोधात प्रलंबित गुन्हा तात्काळ दाखल करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. असे असले तरी पुणे जमीन घोटाळ्याची चौकशी थांबता कामा नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही.

1. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा.
2. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा.
पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे आहे. तसेच धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरतांना दिसले. संधीसाधू माणूस. परत येण्याची तडफड दिसते असेही दमानिया म्हणाल्या.