
– शेअर बाजार गडगडल्यास घाबरून जाऊ नका. शांत रहा, घाईगडबडीत शेअर्सची विक्री करू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय ठेवून चांगले शेअर्स खरेदी करा.
– बाजार पडला तरी सर्व शेअर्स विकू नका. कारण मार्केट परत सावरण्याची शक्यता असते आणि घाईत विकल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
– जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये एसआयपी करत असाल, तर ती चालू ठेवा. बाजार खाली असताना तुम्हाला कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतील.
– जेव्हा बाजार पडतो, तेव्हा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात मिळतात. अशा वेळी योग्य संशोधन करून दीर्घकालीन गुंतवणूक वाढवण्याची चांगली संधी असते.
– सर्व पैसे एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न लावता बाँड्स, सोने किंवा इतर मालमत्तेमध्येही गुंतवणूक करा. त्यामुळे एका सेक्टरमधील घसरणीचा मोठा फटका बसणार नाही.






























































