
1 घर किंवा फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करणे खूप महत्त्वाचे असते. मालमत्तेची नोंदणी कायदेशीर दस्तऐवज आहे. त्यामुळे नोंदणी वेळेवर करावी.
2 बिल्डरने ताबा दिला, पण रजिस्ट्री केली नाही तर तुम्ही त्याबद्दल रेराकडे तक्रार करू शकता. नोंदणीसाठी ग्राहक न्यायालयातही खटला दाखल करू शकता.
3 वकिलामार्फत बिल्डर किंवा विकासकाला कायदेशीर नोटीस पाठवून नोंदणी करण्यास सांगा. त्याही पुढे गरज वाटल्यास दिवाणी न्यायालयात खटला दाखल करा.
4 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केवळ मालमत्तेची नोंदणी केल्याने तुम्ही त्याचे मालक आहात हे सिद्ध होत नाही. त्यासाठी इतर आवश्यक कागदपत्रेही द्यावी लागतील.
5मालमत्ता कर पावत्या, ताबापत्र, वाटपपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा मृत्युपत्र यांसारख्या गोष्टीदेखील मालकी हक्क सिद्ध करतात.































































