Mira Bhayandar news – भयंकर! स्वयंपाकाच्या गॅसची नळी तोंडात धरून तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वयंपाकाच्या गॅसची नळी तोंडात धरून तरुणाने अत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. करण कपाडिया असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही.

मीरा रोड पूर्वेतील कनकिया येथील जय रितु होराईजन या सोसायटीतील ‘ए’ विंगमधील रूम नंबर ९०२ मध्ये करण हा आपल्या कुटुंबासह राहत होता. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास त्याने घरातील गॅस सिलिंडरची नळी तोंडात घेऊन आत्महत्या केली. गॅस शरीरात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास मीरा रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पुनम जांभळे करत आहेत.