‘जेन्झी’ पेक्षा ‘मिलेनियल्स’ जास्त बुद्धिवान, नव्या अभ्यासातून नवा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेव्हा आपण एका जनरेशनचा विचार करतो, तेव्हा असे मानले जाते की, नेक्स्ट जनरेशन ही नेहमी आधीच्या जनरेशनपेक्षा स्मार्ट असते, परंतु अलीकडच्या एका अभ्यासाने हा दावा खोटा ठरवला आहे. अभ्यासानुसार, जेन झी आपल्या आधीच्या पिढीपेक्षा म्हणजे मिलेनियल्सपेक्षा कमी बुद्धिमान आढळून आलीय. याचाच अर्थ मिलेनियल्स ही अशी एक जनरेशन आहे, जी तिच्या पुढच्या जनरेशनपेक्षा एक पाऊल पुढे आहे.

न्यूरोसायंटिस्ट डॉ. जेरेड कूनी हॉरवाथ यांच्या मते, आधीच्या पिढय़ांच्या तुलनेत जेन झेडला अधिक फॉर्मल एज्युकेशन मिळाले असले तरी त्यांच्या काॅग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये  घसरण नोंदवण्यात आली आहे. अटेंशन स्पॅन, प्रॉब्लम सॉल्विंग स्कील, रीडींग, मॅथ्स आणि एकूणच आयक्यूमध्ये ‘जेन झेड’ हे मिलेनियल्सपेक्षा खूप मागे असल्याचे दिसून आले. डॉ. हॉरवाथ यांनी अमेरिकेच्या सिनेट कमिटीच्या समोर हा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, शाळा आणि काॅलेजच्या शिक्षण व्यवस्थेत गरजेपेक्षा जास्त एज्युकेशनल टेक्नोलॉजी म्हणजे अॅडटेकचा वापर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धय़ांकात घसरण होण्यास हेच कारण आहे.

  • तज्ञांच्या मते, एज्युकेशन टेक्नोलॉजी अपग्रेड करणे हा या समस्येवर उपाय नाही. कारण टेक्नोलॉजी मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीशी जुळत नाही.
  • अभ्यासानुसार, 80 पेक्षा अधिक देशांमध्ये शिक्षण व्यवस्थेत डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्समध्ये घसरण झाली.
  • जेन झेड म्हणजे 1997-2010 सालादरम्यान जन्मलेली मुले.
  • मिलेनियल्स म्हणजे 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेली मुले.