
चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता याने अखेर दिल्लीत तिहार तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले. राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला वर्ष 2019मध्ये चेक बाउंस प्रकरणात सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. वर्ष 2018मधील हे प्रकरण होते. बुधवारी दुपारी तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले होते. मात्र, त्याने दया याचिका दाखल करत आणखी मागीतली. ती देखल आज न्यायालयाने फेटाळली. तक्रारकर्त्यांना 25 लाख रुपये तत्काळ देऊन ठरावित वेळापत्रकानुसार उर्वरित रक्कम देण्याची तयारी त्याने दर्शवली. मात्र, एखाद्याची पार्श्वभूमी किंवा व्यवसायाच्या आधारे विशेष लाभ मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नाही, से म्हणत न्या. स्वतंत्र कांत शर्मा यांनी राजपाल यादव तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार यादव याने सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आत्मसमर्पण केले.


























































