जपानमध्ये बर्फवृष्टीचा कहर, 35 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमध्ये 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला असून 358 लोक जखमी झाले आहेत. जपानमधील निगाता, अकिता, यामागाता, होक्काइडो आणि आओमोरी यांसह अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानच्या समुद्र किनारी असलेल्या निगाता या ठिकाणी सर्वात जास्त बर्फवृष्टीचा फटका बसला आहे. या ठिकाणी 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा रस्त्यावर पडलेला आणि छतावर पडलेला बर्फ हटवताना छतावरून पडून मृत्यू झाला आहे. बर्फ पडलेल्या ठिकाणी काम करताना अचानक आजारी पडूनही काही लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानच्या वेगवेगळय़ा समुद्रकिनारी मोठी बर्फवृष्टी झाली आहे. आओमारी येथे 4.5 मीटरहून जास्त बर्फ जमा झाला आहे. जपानमधील प्रशासनाने लोकांना हिमस्खलन, छतावरची स्वच्छता आणि रस्त्यावरचा बर्फ न हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.