
क्रिप्टो बाजारात उलथापालथ पाहायला मिळाली आहे. बिटकॉइन, इथेरियम आणि बाइनेन्स कॉइनसह प्रमुख क्रिप्टो करन्सीमध्ये थेट 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अवघ्या 24 तासांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल 18 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे जागतिक मार्पेट पॅप 2.24 ट्रिलियन डॉलरपर्यंत खाली आला आहे. जोरदार घसरण झाल्यामुळे क्रिप्टो मार्पेटमध्ये भीती आणि अनिश्चितता पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून बिटका@इन दबावात आहे.
आतापर्यंत त्यामध्ये 20 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जवळपास 1,24,000 डॉलरच्या रेकॉर्ड स्तरावर असलेल्या बिटकॉइनची किंमत शुक्रवारी केवळ 65,500 डॉलरवर आली आहे. यातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. क्रिप्टो बाजाराच्या घसरणीचा थेट परिणाम अशा पंपन्यांवर होत आहे, ज्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात डिजिटल संपत्ती आहे. गेल्या वर्षी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱया अनेक पंपन्या आता दबाव सहन करत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला क्रिप्टो बाजाराचे मूल्य 4.38 ट्रिलियन डॉलर होते. ते आता कमी होऊन केवळ 2.26 ट्रिलियन डॉलर राहिले आहे.


























































