असं झालं तर… एसआयपी रद्द करावी लागली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

म्युच्युअल फंड एसआयपी थेट रद्द करता येते. त्यासाठी  म्युच्युअल फंड वेबसाईटला भेट द्या. तुमच्या फोलिओ नंबर किंवा पॅनसह लॉग इन करा. तुमची एसआयपी निवडा.

जर तुम्ही एजंटमार्फत गुंतवणूक केली असेल तर म्युच्युअल फंड कसा बंद करायचा आणि पुढील प्रक्रिया कशी करायची हे जाणून घेण्यासाठी एजंटशी संपर्क साधा.

जर तुमचा एसआयपी बँक एसआय किंवा ऑटो-डेबिटद्वारे चालत असेल तर तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा. ‘ऑटो-डेबिट’ किंवा ‘बिल पे’वर जा.

त्यानंतर एसआयपी – लिंक्ड सूचना रद्द करा किंवा रद्द करण्याची विनंती करण्यासाठी शाखेला भेट द्या. बँकेकडून एसआयपी रद्द केल्याने फक्त ऑटोमॅटिक फंड डेबिट थांबते.

ते पूर्ण थांबवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हीस (ईसीएस) आणि नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच)चा आदेश रद्द करण्यासाठी एएसीकडे फॉर्म भरा.