
आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर पंतप्रधानांनी आपला बचाव करण्यासाठी देशाला विकले, असा दावा संजय सिंह यांनी शनिवारी केला. X वर एक व्हिडीओ शेअर करत ते असं म्हणाले आहेत.
संजय सिंह यांनी असा दावा केला की, जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणांमध्ये नाव समोर आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचे नाव खराब झाले. याच मुद्द्यावरून त्यांना ब्लॅकमेल केले जात असून त्या बदल्यात त्यांनी देशाचे हित धोक्यात घातले आहे.
सिंह यांनी आरोप केला की, परदेशी शक्तींच्या दबावाखाली येऊन मोदी सरकारने काही विशिष्ट करार केले, जे थेट देशाच्या संपत्तीशी संबंधित आहेत. पंतप्रधानांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देशाच्या संसाधनांचा सौदा केला, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.






























































