
एआय तंत्रज्ञानाची जगभरात व्रेझ आहे. हिंदुस्थानही एआयच्या वापरात मागे नाही. हिंदुस्थानने पहिले स्वदेशी एआय मॉडेल विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. हे बहुभाषिक एआय मॉडेल ‘सर्वम व्हिजन’ आता चांगले परिणाम दाखवत आहे. या टेक्स्ट टू स्पीच मॉडेलला जागतिक स्तरावर प्रशंसा मिळत आहे.
पेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘सर्वम व्हिजन’ या पहिल्या स्वदेशी एआय मॉडेलविषयी आज ट्विट केले. ‘देशाच्या एआय मिशनअंतर्गत सर्वमने सादर केलेल्या प्रगत मॉडलचे तांत्रिक परीक्षण झाले आहे. हे मॉडेल कठोर परीक्षणावर कसोटीला उतरले आहे, समीक्षकांनी ‘सर्वम’चे काwतुक केले आहे’ असे वैष्णव म्हणाले. जागतिक स्तरावर हे मॉडेल क्रांतीकारक ठरल्याचा दावा त्यांनी केला. देशातील हुशार आणि तरुण अभियंते हे साहित्य विज्ञान, आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांमध्ये नवीन कल्पनांवर जिद्दीने काम करत आहेत. जागतिक स्तरावर हे मॉडेल क्रांतीकारक ठरल्याचा दावा त्यांनी केला.
एआय स्टार्टअप ‘सर्वम एआय’ने ‘सर्वम व्हिजन’ नावाचे प्रगत मल्टिमॉडल लाँच केले. हे मॉडेल दस्ताऐवजाची बुद्धिमत्ता, ऑप्टिकल पॅरेक्टर रिकग्निशन (ओसीआर) देशाच्या विविध भाषा, लिपी दृश्य भाषा समज (व्हिज्युअल लँग्वेज अंडरस्टँडिंग) यासाठी सक्षम ठरले आहे.
विशेष म्हणजे हे नवीन एआय मॉडेल हे जेमिनी 3 प्रो, जीपीटी-5.2 सोबतच आघाडीच्या इतर एआय मॉडेलपेक्षा सरस ठरल्याचा दावा करण्यात येतो.
सर्वम एआयच्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक सर्वम व्हिजन बहुभाषिक मॉडेल आधुनिक इंग्रजी दस्तऐवज प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे. आपल्या देशात बहुतांश ज्ञान हे विविध ऐतिहासिक शिलालेख, ताडपत्रावरील मजकूर, जुने ग्रंथ, अभिलेखांमध्ये दडलेले आहे. हे प्रगत तंत्रज्ञान त्याचा गाभा समजून घेऊन त्या काळातील ज्ञान जगासमोर आणणार आहे.
सुरुवातीच्या चाचणीत सर्वम व्हिजन या एआय मॉडेलने मराठी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, उर्दू, आसामी. हिंदी, बंगाली, तमीळ, तेलुगू आणि इतर अशा 22 अधिकृत प्रादेशिक भाषांमध्ये ओसीआर कामगिरीत आघाडीच्या एआय मॉडेल्सपेक्षा चांगले परिणाम दाखवले आहेत. यामुळे दस्तावेजांची अचूकता आणि विश्वासनीयता सिद्ध होईल. या तंत्रज्ञानाचा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे.





























































