
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ”पैशाचा महापूरालाही निष्ठेची भिंत फोडता आलेली नाही, उद्याचा काळ आपलाच”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
View this post on Instagram
तुम्ही कमाल केली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही हे यश मिळवले आहे. एकीकडे पैशाचा महापूर होता. अशा महापूरातही त्यांना निष्ठेची भिंत फोडता आलेली नाही. त्यामुळे उद्याचा काळ आपला असणार आहे, अशा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
























































