
कोविडमुळे दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना चार लाखांची भरपाई देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी अमान्य केली.
विधी विभागाचे शिक्षण घेतलेल्या सुनील कुमार यादव यांचा कोविडमुळे झालेला मृत्यू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा दावा करत सुनीलचे वडील रामाशंकर यांनी ऍड. अजय जैस्वाल यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी याचिकाकर्त्यांना 50 हजारांची भरपाई देण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर सरकारी जीआरनुसार याचिकाकर्ते चार लाख रुपये मिळण्यास पात्र असल्याचे ऍड. जैस्वाल यांनी सांगितले. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी अमान्य केली.
























































