IND Vs PAK – इशान किशनचा झंझावात, मधल्या फळीने निराश केलं; पाकिस्तानला जिंकण्यासाठी 176 धावांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र, इशान किशनने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना चोपून काढलं. त्याने 40 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 77 धावांची वादळी खेळी केली. त्याला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळली नाही. तिलक वर्मा (25) आणि सूर्यकुमार यादव (32) यांनी डाव सावरला पण मोठी धावसंख्या उभी करण्यात ते अपयशी ठरले. तर शिवन दुबेने 27 धावांची खेळी केली आणि रिंकू सिंगने 10 धावा केल्या. अखेर टीम इंडियाला 6 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा करण्यात यश आले असून पाकिस्तानला जिंकण्यासाठी 176 धावांचे आव्हान मिळाले आहे.