कंटेनरमधील आगीमुळे एक्प्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Traffic on Mumbai-Pune Expressway was disrupted near Khandala after a container's cabin caught fire on Monday morning. No casualties reported

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात खंडाळ्यातील कुणे पुलाजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरच्या केबीनला अचानक लागलेल्या आगीत कंटेनरची केबीन जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमल, फौजदार समीर कटपाळे, अमित जाधव, जयराज पाटणकर, विक्रम जमादार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱयांना पाचारण केले. देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने 10 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.