
मालवण येथील चिवला बीचवर निसर्गाचा एक अद्भुत सोहळा पाहायला मिळाला. समुद्राच्या लाटांवर हुंदडणाऱ्या तब्बल 75 हून अधिक ‘इंडियन ओशन हम्पबॅक’ डॉल्फिन्सचा महाकळप एकाच वेळी दिसून आला आहे. हे दुर्मिळ दृश्य ड्रोन पॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपण्यात आले असून सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. समुद्री जीव संशोधक डॉ. विशाल भावे आणि त्यांची टीम ‘सरगॅसम’ (तपकिरी शेवाळ) प्रकल्पाचे सर्वेक्षण करत असताना त्यांना हा डॉल्फिन्सचा कळप दिसला.























































