‘खामोश’चा वापर करण्यास मनाई करा, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध ‘खामोश’ डायलागचा गैरवापर सुरू असून यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

आपल्या नावाचा, प्रतिमेचा व खामोश डायलागचा सोशल मींडियावर गैरवापर सुरू आहे. माझ्या सादरीकरणाच्या व्हिडीओत माझी परवानगी न घेता बदल केले जातात. याने माझी प्रतिमा मलिन होत आहे. यास न्यायालयाने निर्बंध घालावेत, असे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे म्हणणे आहे. न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यासंदर्भातील निकाल न्यायालयाने राखून ठेवला.

यशस्वी कारकीर्द

सिनेसृष्टीत मी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक चित्रपटांतून दर्जेदार भूमिका केल्या आहेत. विविध पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले आहे. माझे डायलाग लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर माझे सादरीकरण माझ्या परवानगीशिवाय वापरले जाते. हा सर्व प्रकार गैर आहे, असा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे.