
आपल्या सहजसुंदर अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे आज निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. दुपारी अंधेरी पारशीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीणा देशपांडे यांच्या अभिनयाचा प्रवास रंगभूमीतून सुरू झाला. ‘रेडी’, ‘जलेबी’, ‘द फॅमिली मॅन’, ‘एक व्हिलन’, ‘गब्बर इज बॅक’, ‘हॅक्ड’, ‘ब्लॅकमेल’यांसारख्या सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
























































