अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले! सुप्रिया सुळे यांचा विलीनीकरण चर्चेला पूर्णविराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजितदादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जे काही निर्णय घेतले ते त्यांच्यासोबतच गेले आहेत. आता माझा भाऊच या जगात नाही, त्यामुळे दोन गट एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या चर्चांना काहीही अर्थ उरत नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

सुप्रिया सुळे यांनी आज नवी दिल्लीत विविध मुद्दय़ांवर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली. मुंढवा भूखंड घोटाळ्याच्या चौकशीत विकास खारगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता सुळे यांनी महसूल विभागाचा संबंधित अहवाल अद्याप अधिकृतपणे सार्वजनिक झालेला नाही. जोपर्यंत मी तो अहवाल प्रत्यक्ष वाचत नाही तोपर्यंत एक लोकप्रतिनिधी म्हणून भाष्य करणे मला योग्य वाटत नसल्याचे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

मुंढवा प्रकरणात पार्थवर विश्वास

मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार नाव आल्याचे मी टीव्ही चॅनलवर पाहिले होते. त्यानंतर मी स्वतःहून त्याला फोन केला. त्याला या प्रकरणाची माहिती विचारली. त्यावर तो म्हणाला होता की, आत्या मी काहीही चुकीचे केले नाही. यावर मी तुम्हाला सविस्तर सांगेन. त्याच्या या विधानावर मी विश्वास ठेवला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

झिरवाळांची पाठराखण

एसीबी गृह मंत्र्यांना रिपोर्ट करते. गृह मंत्री मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसतात. मंत्रालयातच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबीने धाड मारणे धक्कादायक आहे. त्याची तक्रार कुणी केली, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. नरहरी झिरवाळ यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे, असे नमूद करत सुप्रिया सुळे यांनी झिरवाळ यांची पाठराखण केली.

No Merger of NCP Factions: Supriya Sule Ends Speculation Over Ajit Pawar’s Group

Supriya Sule clarifies that there is no possibility of merging the two NCP factions, stating Ajit Pawar’s political decisions went with him.