उरणच्या युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी, वरद गावंड याच्या जलरंग चित्रांची सिंगापूर येथील प्रदर्शनासाठी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण येथील युवा चित्रकार वरद गावंड याने आपल्या जलरंग कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी सिंगापूर येथे होणाऱ्या ‘शालोम पीस-2026’ या जागतिक प्रदर्शनासाठी त्याच्या ‘द एज ऑफ द स्टॉर्म’ या कलाकृतीची निवड झाली आहे. हे प्रदर्शन 7 ते 10 जून दरम्यान सिंगापूर येथील मॅकफर्सन आर्ट स्टुडिओ येथे होणार आहे.

देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे बॅचलर ऑफ फाईन आर्टच्या प्रथम वर्षात वरद गावंड शिक्षण घेत आहे. निवड झालेल्या चित्रात सोनेरी, पिवळ्या, निळ्या आणि केशरी रंगछटांमधून आकाश आणि पृथ्वी यांच्यातील नाट्यमय क्षण प्रभावीपणे साकारले आहे. वरदच्या कलाकृतींमधून निसर्गाची भव्यता आणि मानवी भावना यांचा सुरेख संगम दिसून येतो. या प्रर्दशनात कॅनडाचे अतनूर डोगान, चीनचे हाँग शान, सिंगापूरचे सुसाना सुन लियान यांच्यासह जगभरातील परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.