सिद्धांत चतुर्वेदीला बनायचंय युवराज सिंग, वाचा तो नेमकं काय म्हणाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या “दो दिवाने सेहेर में” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धांतने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात क्रिकेटवर आधारित वेब सिरीज ‘इनसाइड एज’ ने केली होती. त्यामुळे त्याच्या मनात क्रिकेटचे स्थान खास आहे. नुकतीच त्याने पुन्हा एकदा क्रिकेटसंदर्भात काहीतरी मोठं काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने हिंदुस्थानी क्रिकेट संघातील बाॅलर युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘इनसाइड एज’ या वेब सिरीजमध्ये सिद्धांतने क्रिकेटच्या ग्लॅमरमागील जगात काय घडते यावर आधारीत व्यक्तीरेखा साकारली होती. युवराज सिंगच्या बायोपिकबद्दल बोलताना तो म्हणतो, “मी २०१९ पासून हे सांगत आहे आणि आज पुन्हा तेच सांगतो, मला आशा आहे की एके दिवशी मला प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगवर बायोपिक करण्याची संधी मिळेल. त्याचा प्रवास खरोखरच अविश्वसनीय होता, एका रोलरकोस्टरसारखा. केवळ एक क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर एक अद्भुत व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्याचा मला आदर आहे. आव्हानांवर मात करण्याच्या त्याच्या जिद्दीला सलाम करतो. तो खरोखरच एक आयकॉन आहे आणि जगाला त्याची कहाणी कळली पाहिजे.”

बायोपिकबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धांत लवकरच दिग्गज चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या आव्हानात्मक बायोपिकमध्ये दिसणार आहे. मुख्य म्हणजे त्याच्या पहिल्या वहिल्या लूकमुळे त्याला प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे.