
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. सुंदर पिचाई हे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी हिंदुस्थानात आले आहेत. दिल्लीतील भारत मंडपम येथे 16 ते 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या समिटमध्ये 20 फेब्रुवारीला सुंदर पिचाई एआयसंबंधी बोलणार आहेत. सुंदर पिचाई हिंदुस्थानात पोहोचल्यानंतर एक्सवर एक पोस्ट शेअर करून एआय इम्पॅक्ट समिटमध्ये परत आल्याने चांगले वाटत आहे. नेहमीप्रमाणे जंगी स्वागत झाले. भरपूर प्रेम मिळाले, असे पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. या समिटसाठी 110 हून अधिक देशातील प्रतिनिधी, 30 आंतरराष्ट्रीय संघटना आणि अनेक देशांतील प्रमुख आले आहेत.




























































