शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली केली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ठगाने परदेशी दूतावास कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार दोन वर्षांपूर्वी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेले. ग्रुप अॅडमीनने दिलेल्या सूचनेनुसार त्याने क्रिप्टो करन्सीच्या वेबसाईडवर जाऊन नोंदणी केली. नफा मिळणार म्हणून त्याने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याने 18 विविध खात्यांत पैसे भरले. सुरुवातीला एका वेबसाईडच्या माध्यमातून ट्रेडिंग करत असताना त्याना 1 लाख 62 हजार रुपये नफा झाला. त्या वेबसाईडवर त्याने केलेल्या गुंतवणुकीवर अधिक नफा जमा झाल्याचे दिसले. नफ्याची रक्कम त्याने काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याना आणखी 18 लाख रुपये भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.