
ICC T20 World Cup मध्ये झिम्बाब्वेने आतापर्यंत सर्वात लक्षवेधी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या बलाढ्य संघाच्या ग्रुपमध्ये असतानाही झिम्बाब्वेचा खेळ आक्रमक राहिला. याच आक्रमकतेच्या जोरावर झिम्बाब्वेने प्रथम ऑस्ट्रेलियाला पराभवाच पाणी पाजलं आणि श्रीलंकेला त्यांच्याच घरात धुळ चारण्याची किमया साधली. साखळी फेरीतील आपल्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव केला आणि ग्रुप बी मध्ये पहिला क्रमांक पटकावला.
कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेच पारड जड मानलं जात होतं. मात्र, झिम्बाब्वेने त्यांना जबर धक्का दिला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 7 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावा केल्या आणि झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 179 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात ब्रायन बेनेट, सिकंदर रझा आणि तादिवानाशे मारूमणी या तिघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सलामीला आलेल्या ब्रायनने 48 चेंडूंमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद संयमी आणि विजयी खेळी केली. त्याला मारुमणीचा चांगली साथ मिळाली आणि त्यानेही महत्तवपूर्ण 34 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार सिकंदर रझाने 26 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 45 धावांची वादळी खेळी करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला आणि झिम्बाब्वेने तीन चेंडू राखून सहा विकेटने सामना जिंकला आणि या विजयासह गुणतालिकेत 7 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला.
Zimbabwe leapfrog Sri Lanka into top spot of Group B with a thrilling win 👏📈
#T20WorldCup broadcast details 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/6nlfHp6Zol— ICC (@ICC) February 19, 2026


























































