
दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती यून सुक योल यांना देशात बंडखोरी करणे आणि देशात जबरदस्तीने मार्शल लॉ लागू करण्यासाठी दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माजी राष्ट्रपतींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माजी संरक्षणमंत्री किम योंग ह्यून यांनासुद्धा 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.




























































