शिक्षिकेने व्हॉट्सअॅपवर लावला इंग्रजीचा पेपर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश बोर्डाच्या 10 वीच्या इंग्रजीच्या परीक्षेवेळी बुऱ्हानपूर जिह्यातील एका शिक्षिकेने चक्क इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचा पेपर आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेट्स म्हणून लावला. राजकुमारी सोनी असे या शिक्षकेचे नाव असून या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने शिक्षिकेसह तीन जणांना तत्काळ निलंबित केले आहे. ही घटना बुऱ्हाणपूर जिह्यातील तुकईथड शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात घडली आहे.