चॅट जीपीटीमध्ये नवे सिक्युरिटी फिचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओपनएआयने चॅट जीपीटीमध्ये दोन नवीन सिक्युरिटी फिचर दिले आहेत. हे फिचर लॉकडाउन मोड आणि एलिवेटेड रिस्क लेबल्स आहे. या टूल्सचा उद्देश हा आहे की, एआय यूजरचा डेटा चोरी केला जाऊ नये. हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट, आधारशी जोडलेली सेवा आणि ऑनलाईन बँकिंगसोबत एआयचा वेगाने होणाऱ्या वापरामुळे हे फिचर महत्त्वाचे आहेत. या फिचरमुळे सायबर फ्रॉड आणि डेटा लीक होणार नाही. एलिवेटेड रिस्क लेबल फिचरमुळे थर्ड पार्टी वेबसाईट किंवा अॅपने कनेक्ट होत असेल तर हे स्क्रीनवर दिसेल. यामुळे यूजर स्वतः ठरवेल की एआय सोबत चॅट करायचे की नाही. लॉकडाऊन मोड हे फिचर खास पत्रकार, का्ॅर्पोरेट प्रोफेशनल्स, सरकारी अधिकाऱ्याकडे असलेल्या संवेदनशील माहितीसाठी आहे.