दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना दिल्लीत लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून लाल किल्ल्याजवळची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांतील सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’ने पुन्हा दिल्लीत घातपाताची योजना आखली आहे. याशिवाय देशातील प्रमुख धार्मिक स्थळेदेखील संघटनेच्या निशाण्यावर आहेत. दिल्लीतील चांदनी चौक परिसरातील मंदिरदेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपास करण्यात येत आहे. मात्र खबरदारी म्हणून प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

इस्लामाबादेत 6 फेब्रुवारी रोजी एका मशिदीत स्फोट झाला होता. त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी घातपाताचा कट आखण्यात आल्याचा संषय सुरक्षा यंत्रणांना आहे.

सीसीटीव्हीवरून पाळत

गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत डॉक्टरांच्या टेरर मॉड्रय़ुलने लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये आत्मघाती स्फोट घडवला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलीस व केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीतील संवेदनशील भागात सीसीटीव्हीवर जास्त लक्ष केंद्रित केले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.