
राजस्थानमधील जोधपूर शहरात राहणाऱ्या शोभा आणि विमला या दोन बहिणींचे शनिवारी एकाच मांडवात लग्न होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. हळद लागली, मेहेंदी लागली व दोन्ही मुली झोपायला त्यांच्या खोलीत गेल्या. मात्र लग्नाच्या दिवशी पहाटे दोघींची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हे ऐकताच आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघींनीही विष पिऊन जीव आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































