
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांनी एकत्रितरित्या एक पत्रकार परिषदत घेत याबाबतची माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या कामाकाजावर सडकून टीका केली.
राज्य सरकारचे सर्व काम गमंतीजमतीतच सुरू आहे. राज्याची आर्थिक, सामाजिक घसरण झाली आहे. राज्यातील एकही गाव सुजलाम, सुफलाम झाले नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर आहे. पीकविमा मिळ नाही, गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. मात्र, पीकविम्याचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना सभागृहात कामकाज रेटून न्यायाचे, जनतेला नवनवीन खोटी आश्वासने द्यायची, असे सुरू आहे.
मुंबईत मेट्रोचे काम सुरू असताना मुलुंडमध्ये झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एक रिक्षा, एक वाहन त्याखाली दबले गेले. मात्र, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही . फक्त पाच लाखांची किंमत सरकारने लावली. आता एका जीवाची ते पाच लाखांची किंमत लावत आहे. सोशल मिडीया आणि बातम्यांमधून या कामाबाबत संशय व्यक्त होत आहे. तरीही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, हे सर्व दुर्दैवी आहे.
सरकारमध्ये इन्फ्रा मॅनवरूनही रस्सीखेच सुरू आहे. मीच खरा इन्फ्रा मॅन हे दाखवण्यासाठी आणि श्रेयवादासाठी चढाओढ होत आहे. त्यांच्यातच अशी भांडणे लागली आहेत. मात्र, त्यांनी राज्यात एकतरी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित उभारले किंवा पूर्ण केले, त्याचे उदाहरण दाखवावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले. कोस्टल रोडवर म्युझिर रोड केला आहे, त्याला विरोध नाही. त्यांना त्यात आणखी काही गमंतीजमती करायच्या असतील तर कारव्यात. मात्र, त्यात साडेसात कोटी खर्च करण्यासारखे खरेच काही आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच एमएमआरडीएने जगातील आठवे आश्चर्य ठरावा, असा विचित्र आकाराचा पूल उभारला आहे. असे पूल उभारण्यातून आणि त्यावर खर्च करण्यातून काय साध्य होणार आहे? अशा कामांची चौकशी झाली आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
अनेक कामे सुरू असताना दिल्लीत एक व्यक्ती खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाच्या पिलरचा भाग कोसळला. अशी घटनांमुळे राज्यात जनतेचे जगणे कठीण झाले आहे, जनता जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहे. शेतकरी नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत असताना त्यांनी काहीही मदत मिळत नाही. त्यांच्या पिकाला हमीभआव नाही, पीकविमा मिळत नाही. शहरी भागात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. तसेच रस्त्याने जाणाऱ्यांमध्येही इन्फ्रा मॅनची भीती आहे. कोणत्याही क्षणी डोक्यावर काही आदळेल का, ही भीती घेऊनच जनता प्रवास करत आहे. भ्रष्टाचार प्रकरणी मंत्र्यांच्या कार्यालयावरच धाडी पडत आहेत. त्यामुळे हे राज्य कोणासाठी आणि कशासाठी चालवत आहे, असा प्रश्न पडतो.
बहुमताचे सरकार असल्याने ते सर्व रेटून नेत आहे. विधानसभा अध्यक्षांची दादागिरी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. त्याचे काम सभागृहात असते. तरीही ते बाहेर दादागिरी करत आहेत. तसेच विनाकारण कोणचीही सुरक्षा काढून घेण्यात येते, त्यामुळे राज्यात नेमके काय सुरू आहे? गतिमान सरकार असे म्हणवून घेणाऱ्यांनी ने इन्ट्रीमध्ये गती वाढवली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. चहापानाला जाऊन काळा चहा, कॉफी घेण्यापेक्षा त्यांचे काळे धंदे सुरू आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठवला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बहुमताचे सरकार असताना भाजपला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटावी, हाच आमचा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा गेल्या दोन अधिवेशनातही आम्ही उचलला होता. त्यामुळे आमच्या विरोधी पक्षनेत्याच्या मागणीला त्यांनी उत्तर द्यावे, अशी आमचे म्हणणे आहे. याआधी विरोधी पक्षांना जबाबदारी आणि सन्मान देण्यात येत होता. मात्र, आता भाजपला एवढी भीती वाटत आहे की, ते विरोधी पक्षनेतेपदच देतच नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

























































