ईपीएफओकडून उच्च पेन्शन सुविधा पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ने खातेधारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओने उच्च पेन्शन सुविधा पुन्हा एकदा सुरू केली आहे. या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात अधिक योगदान देण्याची परवानगी मिळाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 1 सप्टेंबर 2014 आधी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या आधारे त्यांचे पेन्शन योगदान वाढवण्याचा पर्याय मिळाला होता. परंतु पगार मर्यादा ठरवल्यानंतर हायर पेन्शनचा हा ऑप्शन बंद करण्यात आला होता.

2014 मध्ये लागू केलेल्या सध्याच्या मर्यादेनुसार, किमान ईपीएस मासिक पेन्शन 1 हजार आहे. कमाल पेन्शनयोग्य पगार 15 हजार रुपये आहे. यामध्ये मूळ पगार प्लस डीए आहे. यामुळे जास्तीत जास्त ईपीएस मासिक पेन्शन 7 हजार 500 रुपयांपर्यंत मर्यादित होती. 2014 नंतर नोकरीला लागलेले किंवा ज्यांचे पगार या मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यांचे पेन्शन योगदान त्यांच्या मूळ पगारावर आधारित करू शकत नाही.

सध्या कर्मचारी आणि कंपनी त्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के व डीएचे योगदान ईपीएफओ खात्यात देतात. यापैकी कंपनीच्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जाते, तर 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएसमध्ये जमा केलेले पैसे कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मासिक पेन्शन म्हणून मिळतात.

सर्व कर्मचाऱ्यांना लाभ नाही

ईपीएफओने जे काही बदल केले आहेत, त्याचा लाभ सर्व कर्मचाऱयांना मिळणार नाही. उच्च पेन्शन लाभाची पुनर्स्थापना फक्त याच कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. ज्यांनी 1 सप्टेंबर 2014 च्या आधी उच्च पेन्शन पर्याय निवडला होता. याचाच अर्थ सर्व ईपीएफओ सदस्यांना हा नियम लागू होणार नाही.