आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदिगड शाखेत 590 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सोमवारी बँकेच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण होऊन शेअर 67 रुपयांपर्यंत खाली आला. घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँकेने चंदिगड शाखेतील चार अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच संबंधितांविरुद्ध तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी केपीएमजीला स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.