तत्काळ इराण सोडा हिंदुस्थानींना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर इराणमध्ये असलेल्या सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी मिळेल त्या साधनाने तातडीने इराण सोडण्याचा सल्ला हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने आज महत्त्वाची सूचना जारी केली आहे. इराणमध्ये वास्तव्यास असलेले हिंदुस्थानी  विद्यार्थी, पर्यटक, व्यापारी किंवा तीर्थयात्रींनी मिळेल त्या मार्गाने व साधनाने तातडीने इराण सोडावे, असे त्यात नमूद केले आहे.