
पगार दिला नाही म्हणून डिलिव्हरी बॉयने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डिलिव्हरी बॉयला कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
कांदिवली येथे एक पिझ्झाचे दुकान आहे. त्या दुकानात नऊ कर्मचारी काम करतात. तेथे दीड महिन्यापासून अटक आरोपी हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. 12 जानेवारीला त्याला पहिला पगार मिळाला. पगार मिळाल्यानंतर तो कामावर येत नव्हता. कामात अनियमितता असल्याने त्याने त्याला कामावर येऊ नये असे सांगितले होते. त्याचा सहा ते सात दिवसांचा पगार बाकी होता. तो पगार घेण्यासाठी शॉपमध्ये आला. तेव्हा त्याला पगार देण्यात आला नाही.
त्यानंतर दुसऱया दिवशी तो पुन्हा दुकानात आला. त्याने दुकानातील 14 हजार रुपयांची कॅश घेतली. तेव्हा दुकानातील एका महिलेने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तो पैसे घेऊन निघून गेला. घडल्या प्रकाराची माहिती दुकानाच्या मालकाला दिली. घडल्या प्रकरणी त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला.
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेऊन अटक केली.
Mumbai Crime: Delivery Boy Arrested for Theft





























































