
महापालिकेत सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये आज रणकंदन झाले. प्रश्नोत्तरांना बगल देत थेट विषयपत्रिका पटलावर ठेवल्याने सभागृहात भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार घमासान झाले. ठाणे पालिकेत शिंदे गटाच्या या मनमानी कारभाराविरोधात भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी खुर्चीवरून खाली उतरत शिंदे गटाला जाब विचारला. तरीही महापौरांनी मनमानी पद्धतीने कामकाज रेटून नेऊन महासभा गुंडाळली. ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेला कलंक लागला, चार वर्षांचे कारनामे उघड करणार अशा घोषणा भरसभेत भाजपच्या नगरसेवकांनी दिल्या.
आज झालेल्या सभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सभागृह नेतेपदी हणमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेतेपदी अशरफ शानु पठाण यांची निवड जाहीर केली. त्यानंतर पालिकेतील १३१ नगरसेवकांनी आपापला परिचय करून देईपर्यंत सुरळीत सुरू असलेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी थेट विषयपत्रिकेला सुरुवात करताच वादाची ठिणगी पडली. दरम्यान विषयपत्रिका सुरू करताच, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिंदे गटाला नियमाप्रमाणे कामकाज का करीत नाही याचा जाब विचारल्याने गोंधळ उडाला. तसेच पुढील सभेत बोलू दिले नाही तर उपमहापौर पदाचा राजीनामा देईल, असा इशारा यावेळी कृष्णा पाटील यांनी दिला.
मंजूर सर्व १९ विषय रद्द करा
ज्येष्ठ नगरसेवकांना सभेत बोलू न देणे ही बाब नाहीत. ही बाब निषेधार्ह असल्याचे पत्रात अशी मागणी कृष्णा पाटील केली आहे. विषयपत्रिकेवरील १९ विषय चर्चेविना मंजूर केल्याने उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापौरांना पत्र पाठवले आहे. या पत्रात विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना मंजूर करण्यास विरोध दर्शवला. अनेक सभाशास्त्राला अनुसरून नाही. त्याचबरोबर नगरसेविकांच्या लक्षवेधी सूचना व प्रश्न पटलावर घेतलेले नमूद केले आहे. सभेत मंजुरी दिलेल्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांची मंजुरी रद्द करावी, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे.




























































