
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी भोपाळमध्ये किसान महाचौपालचे आयोजन केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते महाचौपालला उपस्थित आहेत. येथे जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, पहिल्यांदाच लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू देण्यात आले नाही. चीनच्या घुसखोरीबाबत आणि देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर विरोधी पक्षेत्याला बोलण्यास नकार देण्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला लोकसभेत बोलू दिले गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकला आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
राहुल गांधींनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल म्हणाले की जेव्हा चीनला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली तेव्हा पंतप्रधान मोदी गायब झाले. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना फोन केला. पंतप्रधान त्यांच्याशी बोलले नाहीत. ते त्यांच्या खोलीत लपतात आणि संरक्षणमंत्र्यांना सांगतात की त्यांनी लष्करप्रमुखांना योग्य वाटेल ते करायला सांगावे. जो उचित लगे, वो करे, असे त्यांचे उत्तर होते. हे सर्व मोजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकात लिहीले आहे. त्याचा संदर्भ आपण दिला होता, असेही राहुल म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात देश विकला. या करारामुळे देशाचा डेटा गेला, शेतकरी, कापड उद्योग आणि रोजगाराचे नुकसान झाले, जे लज्जास्पद आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान अमेरिकेतील अदानी प्रकरणाबद्दल चिंतित आहेत आणि १४ महिन्यांपासून कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सभेच्या ठिकाणी प्रवेश करण्यावरून काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. एसीपी ट्रॅफिक अजय वाजपेयी यांनी सांगितले की, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना प्लॅटिनम प्लाझा आणि व्हीआयपी रोड डेपोमधून प्रवेश दिला जात आहे. वाहतूक जवाहर चौक, माता मंदिर आणि न्यू मार्केटकडे वळवण्यात आली आहे. असे असूनही, काँग्रेस कार्यकर्ते अजूनही अनेक मार्गांवर उभे आहेत. प्रवेश नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे, तर पोलिस परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी काम करत आहेत.


























































