
रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) च्या ११,१२७ रिक्त पदांच्या मेगाभरतीला हिरवा कंदील दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने या भरती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली असून, लवकरच रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यानुसार आणि झोननुसार पदांचा तपशील
या भरती मोहिमेतंर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा ‘दक्षिण पूर्व रेल्वे’ आणि ‘पूर्व तटीय रेल्वे’मध्ये आहेत.
-
मध्य रेल्वे (Central Railway): १,४०० पदे
-
पूर्व तटीय रेल्वे (East Coast Railway): १,६२५ पदे
-
दक्षिण पूर्व रेल्वे (South Eastern Railway): १,५३१ पदे
-
ईशान्य सीमांत रेल्वे (NFR): १,२७६ पदे
-
उत्तर रेल्वे (Northern Railway): ७४० पदे
-
दक्षिण मध्य रेल्वे (SCR): ६७४ पदे (याव्यतिरिक्त इतर सर्व झोनमध्येही पदांचे वाटप करण्यात आले आहे.)
पात्रता आणि अटी
-
शैक्षणिक पात्रता: उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. सोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र किंवा इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा/डिग्री असणे आवश्यक आहे.
-
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल (OBC – ३ वर्षे, SC/ST – ५ वर्षे).
-
वेतनश्रेणी: ही पदे पे-लेव्हल २ अंतर्गत असून, सुरुवातीचे मूळ वेतन १९,९०० रुपये अधिक इतर भत्ते असणार आहेत.
निवड प्रक्रिया कशी असेल?
ALP पदासाठीची निवड प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडेल: १. संगणक आधारित परीक्षा – टप्पा १ (CBT 1) २. संगणक आधारित परीक्षा – टप्पा २ (CBT 2) ३. कॉम्प्युटर आधारित योग्यता चाचणी (CBAT) ४. कागदपत्र पडताळणी (Document Verification) ५. वैद्यकीय तपासणी (Medical Test)
कधी सुरू होणार अर्ज प्रक्रिया?
मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीची अधिकृत अधिसूचना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारांना ‘RRB’ च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल.


























































