
आपल्या उत्तम आरोग्यासाठी भाज्या आणि फळे ही फार गरजेची असतात. भाज्या आणि फळांमधून मिळणारी पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाची मानली जातात. आपल्या शरीराला पोटॅशियमची फार आवश्यकता असते. पोटॅशियम आपल्या मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत ठेवते. तसेच आपल्या हृद्याच्या आरोग्यासाठी पोटॅशियम फार गरजेचे मानले जाते.
जेव्हा पोटॅशियमयुक्त पदार्थांची चर्चा केली जाते तेव्हा बहुतेक लोक केळीला एक चांगला स्रोत मानतात. परंतु केळ्याव्यतिरिक्त इतर अनेक पदार्थ आहेत. जे पोटॅशियमने समृद्ध आहेत. तेही आहारात समाविष्ट केल्याने पोटॅशियमची कमतरता भरुन निघते.
रताळे केवळ गोड नसून अनेक पोषक तत्वांचा स्रोत आहे. थंड हवामानात भाजलेले ते खाणे आनंददायी असते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चा देखील एक उत्कृष्ट स्रोत आहे.
सोयाबीन हे व्हेज प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे हे सर्वांना माहित आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की, ते पोटॅशियमने देखील समृद्ध आहे.
पोटॅशियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुधाचा आहारात समावेश करावा. त्यात व्हिटॅमिन डी आणि बी१२ सारखे पोषक घटक देखील असतात, जे बहुतेक मांसाहारी पदार्थांमध्ये आढळतात.
जर्दाळू हे पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. २ ताजे जर्दाळू तुमच्या दैनंदिन पोटॅशियमच्या गरजेच्या ४ टक्के भाग पुरवू शकतात. ते बीटा-कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचा देखील एक चांगला स्रोत आहे, जे तुमच्या डोळ्यांसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक आहेत.
संत्री व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत मानली जातात, परंतु त्यामध्ये पोटॅशियम देखील भरपूर असते.





























































