मासे विकताना परप्रांतीयाने केली पँटमध्ये लघुशंका, ठाण्यातील किळसवाणा प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मासे  विक्री करताना एका परप्रांतीयाने चक्क पॅण्टमध्ये लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात माशाची टोपली घेऊन बसलेल्या या परप्रांतीय विव्रेत्याने त्याच्या पॅण्टमध्ये लघुशंका केली आणि ओल्या झालेल्या पॅण्टवर हात फिरवत तो मासे विकत होता. हा प्रकार एका जागरूक शिवसैनिकाने उघडकीस आणला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या मासे विव्रेत्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी ठाणेकरांनी केली.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये मासे विक्रीच्या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव केला आहे. हे मासे विव्रेते मुंबई येथील भाऊचा धक्का तसेच कुलाबा बंदर येथून आजूबाजूच्या अनेक शहरांमध्ये मासे विक्रीसाठी आणतात. आज सकाळी असाच एक परप्रांतीय मासे विव्रेता ठाण्यातील पाचपाखाडी येथील चंदनवाडी येथे आला होता. अत्यंत अस्वच्छ आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या विव्रेत्याने पॅण्टमध्येच लघुशंका केली. आणि तसाच बसून तो मासे विकत होता. पॅण्टला हात पुसत होता. शिवसैनिक महेश कदम यांनी हा संतापजनक प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.त्याला हाकलून दिले

पॅण्टमध्ये लघुशंका करून मासे विकणाऱ्या तर्राट परप्रांतीयाला विव्रेत्याला शिवसैनिकांनी धारेवर धरून नंतर त्याला पाचपाखाडीतून हाकलून दिले. अशा गलिच्छ पद्धतीने मासे विकणाऱ्यांवर पोलिसांनी वॉच ठेवून कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.