पालिकेचा दणका… थकबाकीदारांच्या बारा मालमत्तांचा लिलाव सुरू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालमत्ता कर थकविणाऱया मोठय़ा थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने एकूण 12 मालमत्तांची जाहीर ई-लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात 10 मोकळे भूखंड, 1 व्यावसायिक इमारत आणि 1 संमिश्र वापराच्या मालमत्तेचा समावेश आहे. मालमत्ता करापोटी या 12 थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 378 कोटी 63 लाख 67 हजार 557 रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे. वारंवार नोटीस देऊनही थकीत कर भरणा न केल्याने संबंधित 12 मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी 21 दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव केला जाणार आहे.