
मुंबई विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विधी सेवा महामेळ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कॅम्पमध्ये अनेक शासकीय व अशासकीय संस्थांचे स्टॉल लागले होते. विनामूल्य कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या ‘दर्द से हमदर्द’ संस्थेच्या स्टॉलला तसेच ‘वकील आपल्या दारी’ व्हॅनला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती नीला गोखले तसेच अनेक जिल्हा न्यायाधीशांनी भेट दिली. ‘दर्द से हमदर्द’ संस्थेचे पदाधिकारी सुनीता खंडाळे, प्रकाश साळशिंगीकर, गणेश नागरगोजे, ओंकार पाटील, नितीन हजारे, श्रीराम चिंदरकर, समीर सूर्यवंशी, नंदकुमार लहाने यांनी उपस्थितांना कायदेशीर सेवेची माहिती दिली. कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आवारात या विधी सेवा महामेळ्याचे आयोजन केले होते.


























































