चाकरमान्यांच्या भेटीला पालखी निघाली मुंबईला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Ratnagiri's Jakadevi Palkhi Heads to Mumbai After 10 Years

>> दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

‘दाराशी हाय शिमगा…’ म्हटल्यावर चाकरमानी धावतपळत कोकणातील गावात पोहोचतो. रत्नागिरी तालुक्यातील रनपार गावाने मात्र अनोखी परंपरा जपली आहे. या गावच्या जाकादेवीची पालखी दर 10 वर्षांनी चाकरमान्यांना भेटण्यासाठी मुंबईत येते. ही परंपरा जपत जाकादेवीची पालखी आज मुंबईकडे रवाना झाली.

शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालखीला हातभेटीचे श्रीफळ देण्यासाठी चाकरमानी आवर्जून गावी येतात. वयोवृद्ध, आजारी, नोकरीत सुट्टी न मिळाल्याने आणि आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना गावी येता येत नाही. त्यामुळे देवीची पालखी मुंबईत आणावी, अशी मुंबईकरांची मागणी होती. ती मान्य करत 1988 साली पहिल्यांदा पालखी मुंबईत गेली. चाकरमान्यांनी पालखीचे वाजत-गाजत स्वागत केले. त्यानंतर 2011 आणि 2017 मध्ये पालखी मुंबईत चाकरमान्यांच्या भेटीला गेली.

25 फेब्रुवारी रोजी ही पालखी आलिबागस्थित रनपारवासीयांची भेट घेईल व तेथून मुंबईला रवाना होईल.

थेट सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात…

जाकादेवीची पालखी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या गाभाऱयात ठेवली जाईल. 26 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान ही पालखी दर्शनासाठी प्रभादेवी येथे असेल. संध्याकाळी पालखी नाचवली जाईल. या वेळी मुंबईस्थित कोकणाबाहेरील नागरिकांना कोकणातील शिमगा अनुभवता येईल. चाकरमान्यांच्या भेटीनंतर पालखी 2 मार्चला परत फिरेल.

Ratnagiri’s Jakadevi Palkhi Heads to Mumbai After 10 Years

Following a decade-old tradition, the Jakadevi Palkhi from Ranpar, Ratnagiri, departs for Mumbai to meet devotees. It will stay at Prabhadevi’s Siddhivinayak Temple.