
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडय़ात शिवसेनेने सामाजिक उपक्रम आयोजित केला. याअंतर्गत नवापाडा या आदिवासी पाड्यात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गरजू आदिवासी महिलांना साडी वाटप, ज्येष्ठ नागरिकांना शाल वाटप करण्यात आले.
शिवसेना आमदार मनोज जामसुतकर आणि वॉर्ड क्रमांक 210 च्या नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या संकल्पनेतून तसेच विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख व माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामुणकर, महिला विधानसभा प्रमुख रेखा बोराडे, नगरसेविका सारिका झोरे, सिनेट सदस्य व विधानसभा संघटक मिलिंद साटम, सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, महिला शाखा संघटक माधुरी खानविलकर, मितेश जामसुतकर, मितीशा जामसुतकर उपस्थित होत्या. तसेच शाखा समन्वयक योगेश देसाई, इतश्री महाडिक, उपशाखा प्रमुख दशरथ पाटील, युवासेना शाखा अधिकारी आशीष सोंडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विधानसभा संघटक अरुण पवार व शाखाप्रमुख सचिन मोरे यांनी केले होते.
Shiv Sena Provides Aid to Tribal Families in Sanjay Gandhi National Park
To mark Balasaheb Thackeray’s birth centenary, Shiv Sena organizes a social welfare drive, distributing notebooks, sarees, and shawls in Borivali’s tribal hamlets.






























































