
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य लष्करी संघर्षासह जगातील एकूण आठ युद्धे आपण रोखल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला आहे. हिंदुस्थानच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान जर अमेरिकेने मध्यस्थी करून युद्धबंदी घडवून आणली नसती, तर सुमारे साडेतीन कोटी लोकांचा मृत्यू झाला असता, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्याला सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले.
व्हाईट हाऊसमधील आपल्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला स्वतः सांगितले की, जर मी हस्तक्षेप केला नसता तर साडेतीन कोटी लोक मारले गेले असते’. हिंदुस्थानच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत ट्रम्प यांनी अमेरिकन प्रशासनाच्या मध्यस्थीमुळेच युद्ध टळल्याचा आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचल्याचा दावा केला आहे.
donald trump claims saving 35 million lives in india pakistan operation sindoor | saamana
us president donald trump claims that pak pm shehbaz sharif thanked him for intervening in india’s operation sindoor, preventing 35 million deaths. read more on saamana.
saamana, daily saamana, saamana news, donald trump, operation sindoor, india pakistan war, shehbaz sharif, international news in marathi





























































