उपसंचालकाकडे पैशांची खाण, घरातून चार कोटींची रोकड जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये अँटी करप्शनने केलेल्या कारवाईत एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात पैशांचे घबाड सापडले आहे. कटक विभागातील खाणीचे  उपसंचालक पदावर असलेले देबब्रत मोहंती यांना एका परवानाधारक कोळसा वेंडरकडून 30 हजारांची लाच घेताना पकडले. या कारवाईनंतर त्यांच्या भुवनेश्वर येथील घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या घरातून तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड सापडली. लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. भुवनेश्वर फ्लॅटमध्ये ट्रॉली बॅग भरून पैसे सापडले. भुवनेश्वरमध्ये 2400 स्क्वेअर फुटांचा दोन मजली बंगला, 130 ग्रॅम सोने सापडले.