
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये T20 World Cup 2026 मधील सुपर 8 ची महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून झिम्बाब्वेचा फडशा पाडण्यासाठी संघ मैदानात उतरेल. परंतू झिम्बाब्वेने बलाढ्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाची धूळ चारल्यामुळे त्यांना नमवन टीम इंडियासाठी तितकं सोप नसणार, हे नक्की. त्यामुळे चेन्नईमध्ये चाहत्यांना एक रंगतदार लढत पाहायला मिळणार हे नक्की.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यता टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि संघ निवडीवर बरीच टीका झाली. अभिषेक शर्माला अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे त्याचं फॉर्मात येणं संघासाठी गरजेचं आहे. झिम्बाब्वेविरुद्ध संजू सॅमसनला संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिषेक शर्मासोबत तो सलामीला येऊ शकतो. तर तिसऱ्या क्रमांकावर इशान किशनला पाठवलं जाऊ शकतं. संजू सॅमसनला संघात संधी मिळाली तर रिंकू सिंगचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
रिंकू सिंगला अद्याव या स्पर्धेत म्हणाला तसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्याला झिम्बाब्वेविरुद्ध तंबूत बसून सामना पाहावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी उपकर्णधार अक्षर पटेलची संघात वर्णी लागू शकते. उप कर्णधार असूनही मागील दोन सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या दृष्टीने अक्षर पटेलचं संघात असणं फायद्याच ठरू शकतो. वेळोवेळी त्याने आपला दर्जेदार खेळ दाखवला आहे. आता कोणाला संधी मिळणार आणि कोणता पत्ता कट होणार आहे काही तासांमध्ये कळेलच.




























































