
‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची 28 फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे आता 1 मार्चपासून पह्नमध्ये सिम कार्ड असेल तरच व्हाट्सअॅप चालेल अन्यथा ते चालणार नाही. नवीन नियमांनुसार पह्नमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हाट्सअॅपसारखे मेसेजिंग अॅप काम करणार नाहीत. काॅम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हाट्सअॅपदेखील 6 तासांत लॉग-आऊट होईल.
एखाद्या अॅपला सिम बाइंडिंगशी जोडता, तेव्हा ते अॅप तेव्हाच नव्या नियमानुसार, उघडेल जेव्हा तुमचे नोंदणीपृत सिम कार्ड त्याच पह्नमध्ये असेल. सध्या नियमांचे पालन करण्याची मुदत वाढवण्यावर कोणताही विचार नाही, अशी माहिती केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. हे नियम राष्ट्रीय सुरक्षा आणि फसवणूक रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत आणि सुरक्षेच्या मुद्दय़ांवर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे सिंधिया यावेळी म्हणाले.


























































