
मराठी भाषा दिन आज विधिमंडळातही साजरा केला गेला. त्यानिमित्त ‘जावे विनोदाच्या गावा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त केला. सभागृहात मात्र मराठीबद्दलची ती आस्था आमदारांमध्ये दिसून आली नाही. मराठी भाषा दिनी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी अंधेरी सब-वे संदर्भातील लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान पवईतील आयआयटीचा उल्लेख मुंबईऐवजी ‘बॉम्बे’ असा केला. अंधेरी सब-वेमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱया पाण्याच्या निचऱयासाठी करावयाच्या उपाययोजना आयआयटी बॉम्बेच्याच शिफारशीनुसार कराव्यात, आमचा विश्वास फक्त आयआयटी बॉम्बेवरच आहे असे साटम अनेकदा म्हणाले.




























































