
हर्णे येथील सागर मयेकर या आंबा बागायतदाराने हापूस आंब्याचे 6 बॉक्स पुणे येथे विक्रीसाठी पाठवले असून अडीच आणि तीन डझनाच्या एका बॉक्सला 5,551 रुपये एवढा प्रति बॉक्स विक्रमी दर मिळाला आहे. या विक्रीमुळे वर्षातील आंबा विक्रीचा पहिला मान दापोली तालुक्याला मिळाला आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील सागर मयेकर यांनी गुरुवारी अडीच डझनाचे तीन आणि तीन डझनाचे तीन असे एकूण सहा हापूस आंब्याचे बॉक्स पुणे येथील गुरव बंधू आंबेवाले यांच्याकडे विक्रीसाठी पाठवले. बदलत्या हवामानामुळे आधीच हापूस आंब्याचा हंगाम हा लांबला आहे. मात्र मेहनतीच्या जोरावर सागर मयेकर यांनी त्यावर कौशल्याने मात केली
अजून आठ दिवसांनी यापेक्षा अधिक आंबे विक्रीसाठी तयार होतील. केवळ पैसे मिळतील म्हणून नव्हे, तर आंबा विकत घेणाऱया खवय्ये खरेदीदारांनादेखील आंबा खरेदीसाठी खर्च केलेले पैसे तृप्तीच्या ढेकराने वसूल झाले पाहिजेत. आंब्याच्या प्रतवारीच्या दर्जात आणि स्वादातदेखील अजिबातच तडजोड होणार नाही याची खात्री करूनच आंबे झाडावरून उतरवले आहेत.
सागर मयेकर, आंबा बागायतदार, हर्णे




























































